रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील शिवाजी चौक येथे बेकायदा जुगारासारखा स्कीम गेम हा ऑनलाईन खेळ चालवणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरुवार २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वा. करण्यात आली असून रोख रक्कम, वायफाय मशिन स्कैनर मॉरिस आणि इतर साहित्य असा एकूण ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आयुष प्रमोद देसाई (२३, रा. देवूड भाटलेवाडी, रत्नागिरी) आणि नितीन पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस नाईक राकेश तटकरी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हे दोघेही पाली येथे मंदिर जागेत स्कीम गेम हा ऑनलाईन पद्धतीने असलेला जुगारासारखा खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.