देवरुख:- देवरुख शहरातील नावाजलेल्या ओंकार ग्रामिण बिगर शेती सहकारी संस्थेत कोट्यावधीचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी प्राधिकरण चौकशी अधिकारी नवा मुंबई यांनी केली व दि २९ जूलै रोजी ४७ पानी निकाल दिला असून २०१२ सालातील संचालक मंडळातील तत्कालिन अध्यक्षा रश्मी रमेश सप्रे व व्यवस्थापिका वासंती निकम यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर विद्यमान संचालक मंडळातील तीन कर्मचारी व १२ संचालकांना १ कोटी ६३लाख ३५ हजार रकमेच्या अपहार केल्या प्रती दोषी ठरवले आहे. सदरची अपहारीत मागिल वर्षांच्या व्याजासह एकूण ३ कोटी ७५ लाख ३५ हजार ६२ रू. हि सर्व रक्कम ४५ दिवसात संस्थेत भरणा करावयाची आहे.
संस्थेच्या तत्कालिन संचालकांनी संस्थेतीत १ कोटी ६३ लाख ३५ हजार रुपयांचा अपहार उघडकीस आणला होता. हा अपहार व्यवस्थापिका वासंती निकम यांनी केला असल्याचा आरोप करुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर या प्रकरणाची निंबधक कार्यालयाकडून चौकशी सुरु करण्यात आली होती.
हे अपहार प्रकरण २०१६ साली प्रत्यक्षात न्यायप्रविष्ट झाले त्याचे सुनावणी कामकाज सुरू झाले. याच वेळी निबंधक कार्यालयाने प्राधिकृत चौकशी अधिकारी यांच्याकडूनही चौकशी सुरु करण्यात आली होती.
त्यानुसार प्राधिकृत अधिकारी यांनी संस्थेतील सर्व कागदपत्रे यांची सखोल व तपशिलवार तपासणी केली. चौकशीत आजी माजी संचालक व्यवस्थापिका व कर्मचारी यांचे जबाब. व नोंदीदप्तर. आधी कागदपत्रे यांची तपासणी करण्यात आली.
त्या चौकशीत मिळून आलेले मुळ कागदपत्र व नोंदी यांची तपासणी केली असता तारण कर्ज. कँशने केलेले मोठ्यारकमेचे व्यवहार व दिलेले कबूली जबाब वा प्रतिज्ञा पत्रे यात सत्यता आढळून आली नाही त्यासर्वांचा सर्वंकष अभ्यास करून प्राधिकृत अधिकारी सांळूखे यांनी ४७ पानी निकालपत्रद्वारे २९ जुलै रोजी लेखी निकाल देण्यात आला. याची प्रत मंगळवारी सहाय्यक निबंधक कार्यालयासह सर्व संबघितांना अधिकारी यांनी दिली. यात हा निकाल संचालकांच्या विरोधात दिला आहे. यात २३ जणांपैकी १५ जणांना दोषी ठरवण्यात आले.
यात व्यवस्थापिका मनाली मांगले, २ कर्मचारी याचेसह संचालक गजानन जोशी, मुकुंद जोशी,राजाराम जोशी अनिल राजवाडे, विनित पुरोहित, सुनिल खेडेकर, अनिता किर्वे, मधुरा केळकर, विकास शृंगारे, संदिप कारेकर, सुजाता कारेकर, दत्तात्रय भस्मे यांना दोषी ठरवले आहे.व अपहाराची जबाबदारी संचालित मंडळांची असल्याचे नमुद करून ती अपहार रक्कम१ कोटी ६३लाख ३५हजार व त्यावरील १कोटी ७१लाख ७३ हजार ६२ हि रक्कम १५% व्याज धरून असे एकूण ३ कोटी ७५लाख ३५हजार वसुल करणेसाठी कर्मचारी व संचालक मंडळाने भरावी व ती समान वाटीने भरावी असे आदेश दिले त्या आदेशानुसार प्रत्येक संचालकांना साधारण २४लाख रू. भरावे लागणार आहेत. ती रक्कम त्यांनी न भरलेस त्याचे मालमत्तेवर टाच आणून वसूल केले जातील..
यातील संदिप कारेकर यांना केवळ ७७ हजार तर सर्व दोषींना प्रत्येकी २४ लाख ३६ हजार १७७ रक्कम भरणा करावयाची आहे. हि रक्कम ४५ दिवसाच्या आत भरणा करावयाची आहे. या निकालाने सर्व सामान्य ठेविदांरानी आनंद व्यत्क केला आहे..