रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी बसस्थानकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिवहन मंत्र्यांची ठेेकेदार असोसिएशन बरोबर मिटींग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही ठेकेदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापूर दौर्यावर असताना भेटले असून, उपमुख्यमंत्री आता परिवहन मंत्र्यांशी चर्चा करुन ही मिटींग लावणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. यावर तोडगा निघाला तरी पावसाळ्यात काम सुरु करुनही उपयोग होणार नाही. मात्र, पावसाळ्यानंतर काम नियमितपणे सुरु होऊ शकेल. ठेकेदार असोसिएशनकडून राज्यातील बसस्थानकाच्या कामांचे वाढीव बजेट मिळावे म्हणून मागणी करण्यात आली होती. हे वाढीव बजेट मिळत नाही म्हणूनच जवळपास 18 बसस्थानकांचे कामे रखडली आहेत. जरी वाढीव बजेट दिले तरी पावसामुळे काम रखडणार आहे.