रत्नागिरी:- भोके गावात मुंबईतून येणाऱ्या लोकांची घरे दक्षता समितीने बाहेरून कुलूप बंद करून मानवतेला लाजवेल असा प्रकार केला आहे. क्वारंटाईन केलेल्या चाकरमान्यांना घरात बंद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ गावाकडे पळत आहेत. पण नेहमी मुंबईकर म्हणजे चाकरमानी यांचे स्वागत करण्यात धन्य मानणारे हेच ग्रामस्थ आता मुंबईकरना अमानुष वागणूक देत आहेत. प्रशासनाने या लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या होत्या क्वारंटाईन असा शिक्का त्यांच्या हातावर मारला आहे.
आपल्या गावातच अशी वागणूक दिली जात असल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.अशा वागणुकीमुळे सामाजिक प्रश्न निर्माण गावागावात निर्माण होऊ लागले असल्याने गावचे ऐक्य धोक्यात आले आहे. अशा वागणूकीमुळे आधीच मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोकळा श्वास घेणाऱ्या चाकमाण्याला गावातही कोंडुन ठेवलं जात आहे. लोकांना घरात बंद करून बाहेरून कुलूप लावण्याचे प्रकार असे अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात दक्षता समितीने क्वारंटाईन करण्या आलेल्या लोकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी असे मुंबईतून आलेले ग्रामस्थ करत आहेत.