खेडमध्ये सीएनजी इको कार जळून खाक

खेड:-खेड येथून तिसंगी गावाकडे जाणार्‍या मारुती कारने पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालक आपल्या ताब्यातील (MHO4 FA O49) ही कार घेऊन शैलेश जाधव घेऊन जात होते. कारने अचानक पेट घेतल्याचा प्रसंग लक्षात आल्याने चालक बाहेर पडला. सदरची आग सीएनजीच्या टाकीतून गळती झाली असल्याने आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली. सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी खेड नगरपरिषद बंब गाडी घेऊन आग  विझवण्यात यशस्वी झाले, मात्र गाडीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.