रक्ताचाही काळाबाजार करणारी टोळी रत्नागिरीत सक्रिय; रत्नागिरी ते थेट कोल्हापूर कनेक्शन 

रत्नागिरी:-रत्नागिरीत रक्ताचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती पुढे आली आहे. या टोळीत मध्ये काम करणारे खासगी रक्तपेढीतील माजी कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे देखील आता बोलले जात आहे. रत्नागिरीत रक्त संकलित करून कोल्हापूर नेले जात आहे आणि कोल्हापूरमध्ये या रक्ताचा काळाबाजार केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कोल्हापूर येथील एका रक्तपेढी च्या माध्यमातून रत्नागिरी वारंवार रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. परजिल्ह्यातील रक्तपेढी रत्नागिरी वारंवार रक्तदान शिबिर घेतल्याने अनेकांना त्याबाबत संशय आला होता. आज पर्यंत रत्नागिरी तून 150 ते 250 डोनर घेवून कोल्हापूरात रक्ताच्या पिशव्या पाठवल्या जात आहेत. कोल्हापूर येथील एक खाजगी रक्तपेढी या सर्वात पुढे असल्याची माहिती समोर आली आहे रत्नागिरीतून रक्त संकलित करायचं आणि 2800 रुपयांना एक पिशवी कोल्हापुरात विकायची असा व्यवसायदेखील सुरू झाला असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

 यापूर्वी रत्नागिरी जिल्हा थॕलेसिमिया सन्मवयक राजेश नार्वेकर यांनी याबाबतची तक्रार केली मात्र कोणतीही रक्तपेढी कोणत्याही जिल्ह्यात जाऊन रक्तदान शिबीर घेऊ शकते असे उत्तर त्यांना देण्यात आले. मात्र वारंवार असे रक्तदान शिबिराचे आयोजन एकाच ठिकाणी परजिल्ह्यातील रक्तपेढी घेऊ शकत नसल्याने नार्वेकर यांनी पुढे येऊन या विरोधात आवाज उठवला आहे.

रत्नागिरीतील पेशंट कोल्हापुरात जातात त्यांना ती रक्ताची गरज भासते आम्ही त्यांना रक्ताचा पुरवठा करतो अशी उत्तरे संबंधित व्यक्तीने दिले आहेत मात्र रत्नागिरीतून नेमके किती रुग्ण जातात आणि किती रुग्णांना रक्ताचा पुरवठा केला जातो त्याची माहिती कोणी देऊ शकलो नाही.

याबाबत धक्कादायक खुलासे होत असून दहा टक्के पासून विविध प्रकारची गिफ्ट देण्याचं प्रलोभन दाखवलं जात असल्याचा देखील आता पुढे आला आहे. कोल्हापूर येथील खाजगी रक्तपेढीला रत्नागिरीतील डोनर चा डेटा कोणी पुरवला असा प्रश्न उपस्थित होत असतानाच एका रक्तदान शिबिराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यातूनच माहिती कोणामार्फत पुरवली जात आहे याचा खुलासा झाल्याने त्यातील तक्रारदार राजेश नार्वेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आधी माझ्या जिल्ह्यातील रुग्णांना रक्त मिळाले पाहिजे आणि त्यानंतरच इतर जिल्ह्याचा विचार व्हायला पाहिजे आयोजकांनी परजिल्ह्यातील रक्तपेढीचे कॅम्प वारंवार या जिल्ह्यात आयोजित करू नयेत असावा देखील नार्वेकर यांनी केला आहे .

यापूर्वी एका खाजगी रक्तपेढीत कामाला असलेली व्यक्ती सध्या खासगी रुग्णालयात स्टोरेज सेंटरमध्ये कामाला आहे आणि या व्यक्तीच्या मार्फतच रत्नागिरीतील डोनर ची माहिती पुरवली जात आहे असा दाट संशय नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे . त्यामुळे रत्नागिरीतही रक्ताचा काळा बाजार सुरु झाला असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. थॕलेसिमिया तसेच आप्तकालीन रुग्णांना रक्ताची गरज लागल्यास रक्तदाते मिळणार नाहीत अशी भिती देखील आता निर्माण झाली आहे .थॕलेसिमिया या आजाराचे जिल्ह्यात पंच्याहत्तर रुग्ण आहेत या रुग्णांना दर महिन्याला दोन बॅगा मोफत द्यावे लागतात जर वर जिल्ह्यातील रक्तपेढ्या रत्नागिरीतून डोनर शोधून रक्ताच्या पिशव्या कोल्हापुरात येऊ लागले तर अशा रुग्णांना रक्त उपलब्ध होणार कुठून असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

यापूर्वी फलक तीन ते चार वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आलं आता पाचव्यांदा अशा प्रकारच्या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने हे शिबिर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा देखील राजेश नार्वेकर यांनी दिला आहे. तसेच या विरोधात कायदेशीर कार्यवाहीसाठी नार्वेकर यांनी एसबीडीसी तसेच जिल्हा रुग्णालय आणि अन्नऔषध प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे हा प्रकार गंभीर असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रकार वेळीच थांबवावेत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.