दुचाकीला धडक देऊन कारचालक फरार, दोघेजण जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठेत सोमवारी रात्री 9 वा. च्या सुमारास कार व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले असून कार चालक धडक देऊन फरार झाला आहे.

पाली ते साखरपा असे दुचाकीवरुन जाणार्‍या स्वारांना कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्‍या कारने विरुध्द दिशेला जावून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेजण धडकेने रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. तर कार चालकाने तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.