एलसीबीची मोठी कारवाई; दोन बंदुका, जिवंत काडतुसांसह बिबट्याचे कातडे जप्त

रत्नागिरी:- वन्य जीव संरक्षणाच्यादृष्टाने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बंदुका जीवंत काडतुसे आणि बिबट्याचे  एक कातडे जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि खेड पोलिसांकडुन ही कारवाई करण्यात आली आहे.

डॉ . मोहित कुमार गर्ग , पोलीस अधीक्षक , रत्नागिरी यांनी वन्य जीव संरक्षणाच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने चिपळुण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे , गुढेफाटा येथे गुढेफाटा ते पाथरटी जाणारे रस्त्यावर दोन इसम मोटारसायकलीने जाताना संशयास्पद हालचाली दिलल्या. त्यांची मोटरसायकल थांबवुन त्या
व्यक्तींची ताब्यातील सॅकची तपासणी केली.  सॅकमध्ये वन्य जीव बिबट्याचे कातडे तसेच सिंगल बॅरल काडतुसची परवाना नसलेली बंदुक फोल्ड केलेल्या स्थितीत आणि चार जिवंत काडतुसे मिळुन आली. आल्याने सदरच्या वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांची दुचाकी जप्त करण्यात आलेली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर यांच्या तक्रारीवरून चिपळुण पोलिस ठाण्यात वन्य जीव प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ ये कलम ३९ , ४४,४८,५०,५१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला. या गुन्ह्याअंतर्गत संशय़ित सचिन रामचंद्र साखरकर ( वय ३६ , रा . दूंगवे , साखरकरवाडी , ता . चिपळूण), प्रदेश प्रकाश बुदर ( वय ४० , रा . बुदरवाडी , गुडे , ता . चिपळूण) यांना अटक करून न्यायालयालयात हजर केले असता १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली ही कामगिरीत चिपळुण पोलिस ठाण्याचे पोउनि श्री . माने , तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोफो प्रशांत बोरकर , हवालदार नितीन डोमणे , अरुण चाळके , बाळ पालकर , पो.ना. योगेश नार्वेकर , सत्यजित दरेकर व दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग यांनी केली. वन विभागाचे दत्ताराम राजाराम सुर्वे यांनी मदत केली.

तसेच खेड पोलिसांनी देखील बेकायदा बंदुकीविरुद्ध कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे पोलिस पथकाने सचिन संतोष गोठल (वय २३ , रा . मौजे मुरडे , शिंदेवाडी , ता . खेड) याच्या घरावर छापा टाकला.  त्या घरातुन एक विनापरवाना असलेली बंदुक जप्त केली . त्यानंतर अशी माहिती मिळाली कि , सदरची बंदुक त्यांनी पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री (वय ५३, रा . तळवडपाल , उपाळेवाडी , ता . खेड ) याचेकडुन खरेदी केली. त्यानंतर पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री यांच्या घरावर छापा टाकला. जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बंदुका आणि एक बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले.

भारतीय हत्यार कायदा कलम ३,५.२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. संशयित सचिन गोठल, पांडुरंग मेस्त्री यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. खेड पोलिस निरीक्षक श्रीमती निशा जाधव याच्या
मार्गदर्शनाखाली सपोनि सुजित गडदे , पोहवा / विक्रम बुरोडकर , संकेत गुरव , रोहित जोयशी , किरण चव्हाण यांनी ही कारवाई केली.