उन्हाळी सुट्टी हंगामात कोरे मार्गावर १४ जादा ट्रेन धावणार

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने आगामी काळातील सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष चौदा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. सुट्टीच्या कालावधीत एप्रिल-मे दरम्यान दरवर्षी चाकरमानी कोकणात गावी सहकुटुंब येतात. त्यांचा हा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी कोकण कोकण रेल्वे प्रशासनाने चौदा विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सोडणार आहे. या विशेष गाड्या ७ एप्रिलपासून ते २० एप्रिलदरम्यान धावणार आहेत.

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या या विशेष गाड्या ७ एप्रिलपासून ते २० एप्रिलदरम्यान धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ७, ९, ११, १३, १५, १७ आणि १९ एप्रिल रोजी सुटणार आहे. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उन्हाळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक

गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ७, ९, ११, १३, १५, १७ आणि १९ एप्रिल रोजी (७ फेऱ्या) रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष गाडी थिविम येथून दिनांक ८, १०, १२, १४, १६, १८ आणि २० एप्रिल रोजी (७ फेऱ्या) थिविम येथून दुपारी ०२.१०. वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजत पोहोचेल.

गाडीचे थांबे

२२ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली,सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.