रत्नागिरी:- दाभोळे घाटातील नित्यानंद धाबा येथील अवघड वळणावर स्वीफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विरुध्द दिशेला जावून बोलेरो धडक दिली. या धडकेत 3 जण जखमी झाल्याची घटना 26 मार्च रोजी रात्री 8.30 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन शिंदे (40, सांगली) हे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप पावस ते पुणे अशी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाने घेवून जात होते. दाभोळे घाटातील वळणावर समोरुन भरधाव येणार्या स्वीफ्ट कारने विरुध्द दिशेला जावून बोलेरोला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरोतील 3 जण जखमी झाले. नितीन सुरेश शिंदे, ॠषिकेश बोंद्रे, दिनेश भाट अशी जखमींची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद नितीन शिंदे यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार स्वीफ्ट कार चालक ॠषिकेश बोंद्रे (साळवीस्टॉप, रत्नागिरी) याच्यावर भादविकलम 279, 337, 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.