रत्नागिरी:-रोटरी क्लब मिडटाउन रत्नागिरी व माचाळ मुचकुंदी विकास संस्था यांचा संयुक्त विद्यमाने माचाळ येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माचाळ येथील 70 ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील माचाळ हे गाव डोंगर माथ्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेले असून तेथील निसर्गसौंदर्य फारच सुंदर असल्यामुळे माचाळला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या गावी सुमारे सत्तर ते ऐंशी घरे असून तेथे एस.टी.ची सुविधा नाही. खाजगी वाहनाने तेथे जावे लागते. तेथील लोकांना वैद्यकीय सेवा वारंवार किंवा ताबडतोब उपलब्ध होऊ शकत नाही. तेथील लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने 13 मार्च रोजी माचाळ या गावात, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन व माचाळ मुचकुंदी विकास सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामस्थांना आरोग्य सेवा सुविधा पुरविण्याचे कामी मेडिकल चेकअप कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्प मध्ये सुमारे 70 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या वैद्यकीय कॅम्पमध्ये वैद्यकीय परीक्षण करणेकरीता क्लबचे सदस्य डॉक्टर विवेक पोतदार, डॉक्टर स्वप्ना करे ,डॉक्टर वैभव कानडे हजर होते. हा कॅम्प उपक्रम रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊन चे अध्यक्ष संजीव सुर्वे, सचिव हिराकांत साळवी , खजिनदार बिपिनचंद्र गांधी, क्लब सदस्य डॉ.वामन सावंत सर, डॉ. केतनकुमार चौधरी सर तसेच माचाळ मुचकुंदी विकास सेवा सहकारी संस्थेचे श्री.विवेक सावंत यांचे अथक प्रयत्नांमुळे यशस्वी झाला. या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनचे सर्व सदस्य हजर होते.