रत्नागिरी:- मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशाची हॅण्डबॅग चोरीला गेल्याची घटना घडली असून या बागमध्ये असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह 2 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद बाळकृष्ण गोपाळ शेट्टी (54, मीरारोड, ठाणे) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली आहे. बाळकृष्ण शेट्टी हे उडपी येथून मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्यांची पत्नी झोपलेली असताना अज्ञाताने हॅण्डबॅग चोरुन नेली. यामध्ये 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 1 लाख 85 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडया, 5 हजार रोख रक्कम असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादवि कलम 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.