खेड येथे मारुती सुझुकीच्या अपघातात पुण्यातील एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरी मौजे निगडे येथे चारचाकीवरील ताबा सुटल्याने विरुध्द दिशेला जाऊन आदळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना 29 जानेवारीला घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार वसंत सातपुते (30, रा. पुणे) हा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी बलेनो चालवत होता. महामार्गावरील निगडे बस स्टॉप येथे आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. सुझुकी 200 मीटरपर्यंत फरफटत गेली. रस्त्याच्या विरुध्द दिशेला जाऊन कठडयावर आदळली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक पुजऱ्या ब्रिजलाल कोकणी यांनी खेड पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार सातपुते याच्यावर भादवि कलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करत आहेत.