रत्नागिरी:- तलाठी कार्यालयात फेर्या मारूनही सातबारा मिळत नाही या कटकटीपासून नागरिकांची सुटका झाली आहे.आता नागरिकांना सेतू कार्यालयातच सातबारा मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रात ऑनलाइन सातबारा, गाव नमुना 8 आणि ऑनलाईन फेरफार देण्याचे काम सुरू झाले आहे. अशाप्रकारे सेतू केंद्रातून ऑनलाईन सातबारा देणारा रत्नागिरी हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.
सातबारासह अन्य कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी महसूल विभागात ऐकायला मिळतात. सातबारा किओस्क हि यंत्रणा असली तरी नेटवर्क आणि अन्य काही मर्यादा त्या यंत्रणेला आहेत. अशावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सातबारा सह जमिनीशी संबंधित महत्वाचे कागदपत्र तातडीने मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी सर्व सेतू केंद्रात सातबारा, गावनुमना 8 आणि फेरफार देण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.आज प्रजासत्ताक दिनी सेतू कार्यालयातून हे दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे.
सेतू केंद्रात जाऊन नागरिक सातबारा,गाव नुमना 8 आणि फेरफारचे कागदपत्र पाहू शकतात तसेच प्रतही घेऊ शकतात.महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कागदपत्रे त्यांना सेतू मध्ये पाहायला मिळतील.
– डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी