दीड मिनिटांत मिळणार मातीच्या आरोग्याची माहिती

रत्नागिरी:- शेतकर्‍यांना उत्पादनात वाढ करण्यास उद्युक्त करण्यासाठी आवश्यक असेल्या माती परीक्षणासाठी आता शेतकर्‍यांंना तिष्ठत राहावे लागणार नाही. अगदी केवळ दीड मिनिटात मातीच्या आरोग्याची माहिती आणि त्याची उपजतता केवळ एका क्लिकद्वारे उपलब्ध होणार आहे, तेही ऑनलाईन .

भरघोस उत्पादनासाठी मातीची उत्पादकता मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. उत्पादनवाढीसाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करीत असतात. त्या माध्यमातून पिकांना लागणारी आवश्यक घटकांची पूर्तता केली जाते. मातीमध्ये असलेली कोणते पोषणमूल्य किती प्रमाणात आहेत, हे आपल्याला माती परीक्षणावरून कळते. यासाठी काही मिनटांमध्ये शेतकर्‍यांना माती परीक्षण करुन मिळणार आहे.

महत्त्वाच्या माती परीक्षणामध्ये तंत्रज्ञानामुळे एक महत्त्वाचे पाऊल पडले असून आता माती परीक्षणासाठी वाट पाहण्याची गरज नाही. कारण आता यासाठी आयआयटी, कानपूर येथे एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांनी एक पोर्टेबल माती परीक्षण उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे अवघ्या 90 सेकंदात मातीच्या आरोग्याची माहिती देणार आहे. विशेष म्हणजे नमुना म्हणून फक्त पाच ग्रॅम माती यामध्ये वापरावी लागणार आहे. ऑनाईन माती परीक्षण
या पोर्टेबल यंत्राच्या साह्याने भूपरीक्षकामध्ये नमुना म्हणून फक्त पाच ग्रॅम वाळलेल्या मातीची गरज असते. पाच सेंटीमीटर लांबीच्या दंडगोलाकार उपकरणांमध्ये माती घातल्यानंतर हे उपक्रम स्वतः ब्ल्यूटूथद्वारे मोबाईलला जोडते आणि अवघ्या पाच सेकंदात मातीचे विश्लेषण करायला सुरुवात करते.विश्लेषणानंतर माती परीक्षण चाचणी चे परिणाम जमिनीच्या आरोग्य अहवालाच्या स्वरूपात स्क्रीनवर दाखवते.