कंटेनरची तीन वाहनांना धडक; देवरुख-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- देवरुख रत्नागिरी मार्गावरील बावनदी येथे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना धडक होऊन अपघात घडला. या अपघातानंतर देवरुख रत्नागिरी मार्गावरील वाहतूक तास ठप्प होती. 

 बावनदी ते निवळी व बावनदी ते वांद्री अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे . अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती घटननास्थलावरून प्राप्त झाली आहे . पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंटेनर ला हटवण्यासाठी क्रेन ला देखील पाचारण करण्यात आले आहे.