वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची पादचाऱ्याला धडक; अपघातानंतर डंपरचालक फरार

संगमेश्वर:- संगमेश्वरमधील कळंबुशीमध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची पादचाऱ्याला  जोरदार धडक बसून तो गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश गोरीवले असे पादचाऱ्यांचे नाव असून धडक दिल्यानंतर डंपरचालक फरार झाला. संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी प्रकाश गोरीवले यांना उपचारासाठी कोल्हापूरमध्ये रवाना केले आहे. रात्रीच्या वेळेस अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून याबाबत संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळेस वाळू वाहतूक करणारे बेदकारपणे वाहने चालवत असल्याच्या तक्रारींकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे.