ट्रिपल सीट दुचाकीस्वाराची कारला धडक

रत्नागिरी:- दुचाकीवर ट्रिपल सिट घेउन बेदरकारपणे दुचाकी चालवून कारला धडक देत अपघात केला.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अपघाताची ही घटना शनिवार १८ डिसेंबर रोजी रात्रीच्यावेळी टीआरपी येथे घडली. आदित्य रविंद्र धनावडे (२३,रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.याबाबत राकेश जगन्नाथ राउत (२१, रा.नाचणे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली होती.त्यानूसार,शनिवारी रात्री ते त्याच्या  ताब्यातील कार (एमएच-४३ -एबी- ८३८९ ) घेउन कोकणनगर येथून सह्याद्रीनगर नाचणे येथे जात होते.त्याच सुमारास आदित्य धनावडे त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८ -के-९८५१ ) वरुन आविष्कार कांबळे आणि अथर्व कांबळे या दोघांना घेउन कांरवांचीवाडी ते मारुती मंदिर असा जात होता.ही दोन्ही वाहने टीआरपी येथील सह्याद्रीनगर फाट्यासमोर आली असता आदित्य धनावडेचा दुचाकीवरील ताबा सूटला आणि त्याने समोरुन येणार्‍या कारला धडक देत अपघात केला होता.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.