रत्नागिरी:- तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघड झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जातिवाचक शिवीगाळ करून लग्नास तरुणीला नकार दिला. याप्रकरणी शहर पोलिसांनी तरुणासह त्याच्या आई- वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम संजय सुर्वे, गंधाली संजय सुर्वे व संजय जीवन सुर्वे ( सर्व रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी ) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २०१८ या कालावधीत घडली आहे. पीडित तरुणी व शुभम यांची २०१८ पासून ओळख होती. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी व फिर्यादीच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने शुभम याला लग्न करण्यास सांगितले. त्यावेळी शुभम व त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. याप्रकरणी तरुणीने शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ (ॲट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.