नाताळ, नववर्ष सुट्टीत पर्यटकांसासाठी विशेष व्यवस्था; कोरे मार्गावर धावणार ४ गाड्यांच्या ४२ फेऱ्या 

रत्नागिरी:- नाताळ सुट्टीसह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या ४ साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या १८ डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमाळी, करमाळी-पनवेल या गाड्यांचा समावेश आहे. पूर्णपणे आरक्षित असणार्‍या या गाड्यांच्या ४२ फेर्‍या धावणार असल्यामुळे पर्यटकांचा कोकणात येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांमध्ये दादर-थिविम (०१२८७/०१२८८) साप्ताहिक स्पेशल १८ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत दर बुधवारी व शनिवारी धावेल. दादर येथून रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी दादरला पोहोचेल. १७ डब्यांच्या स्पेशल गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्ड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभवावाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आदी थांबे आहेत.

थिविम-पनवेल (०१२९०/०१२८९) आठवड्यातून तिन दिवस धावेल. १८ डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत दर बुधवारी, शनिवारी व रविवारी थिविम येथून दुपारी १.३० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर गुरुवारी, रविवारी व सोमवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटून त्याचदिवशी दुपारी १ वाजता थिविमला पोहोचेल.

पुणे-करमाळी स्पेशल (०१२९१/०१२९२) १७ ते ७ जानेवारीपर्यंत धावणार आहे. दर शुक्रवारी धावणारी ही गाडी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर रविवारी करमाळीतून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. करमाळी- पनवेल (०१२९४/०१२९३) १८ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत दर शनिवारी धावेल. करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याचदिवशी रात्री ८ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल येथून शनिवारी रात्री १० वाजता सुटून सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल. कोकण मार्गावर ३ नियमित गाड्यांना मुदत कोकण मार्गावरून धावणार्‍या मांडवी कोकणकन्या एक्सप्रेसपाठोपाठ आणखी नियमित गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दिवा- रत्नागिरी, सावंतवाडी- मडगाव पॅसेंजर, दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस १ डिसेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत धावेल. सावंतवाडी- मडगाव नियमित पूर्णपणे अनारक्षित करण्यात आली आहे