रत्नागिरी:- शहरातील राजापूरकर कॉलनीतील बंद घर फोडून अज्ञाताने सुमारे 62 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना 25 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे.
याबाबत बिस्मा तबरेज काझी (30, रा. राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार,त्यांच्या बंद घराचे कुलूप व लॅच तोडून अज्ञाताने 35 हजार रोख रक्कम, 20 हजारचा टीव्ही आणि 6 हजार 525 रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण 61 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.