भाट्ये येथे जोरदार धुमश्चक्री; दोघांना हत्यार, दांडक्याने मारहाण 

रत्नागिरी;- शहरानजीकच्या भाट्ये येथे जोरदार धुमश्चक्री झाल्याची घटना घडली आहे. लग्न समारंभासाठी जमलेल्या दोघांना हत्याराने तसेच दांडक्याने मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीची ही घटना बुधवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वा.घडली.अदनान भाटकर,मुसेफ साखरकर,यासीर साखरकर,रजिन होडेकर,मुईन भाटकर आणि ताहिर साखरकर (सर्व रा.नवानगर भाट्ये,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात सरोज बशीर साखरकर (20,रा.नवानगर भाट्ये,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

बुधवारी दुपारी भाट्ये नवानगर येथे गावातील लग्न समारंभ असल्याने गावातील इतर मंडळी व सरोज आणि त्यांचे भाउ साकिब आणि आयान साखरकर हे सर्व गप्पा मारत उभे होते. त्यावेळी संशयित मुसेफ आणि यासीर साखरकर या दोघांनी तिथे येउन अज्ञात कारणातून सरोज यांचा भाउ साकिबला कोणत्यातरी हत्याराने व दांडक्याने मारहाण केली.त्यानंतर इतर संशयितांनीही शिवीगाळ करत सरोज व त्यांच्या भावांना धकलाबुकल करुन हातांनी व पायांनी मारहाण करुन तुला बघून घेउन सोडणार नाही अशी धमकि दिली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महाले करत आहेत.