देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील उमरे बौद्धवाडीतील तिघेजण आंघोळीसाठी सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान उमरे धरणात गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. नजिकच्या शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांना ही घटना समजताच दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले तर एकजण बुडाला असून ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमरे बौद्धवाडीतील तिघेजण सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उमरे धरणात अंघोळी करण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने संदेश मोहिते हा तरूण पाण्यात बुडाला आहे. तर दोघांना ग्रामस्थांनी वाचवले आहे. बुडालेल्या संदेश मोहिते याचा ग्रामस्थ शोध घेत असुन घटनेची खबर संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीसांनी घटनास्थळी जावून ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्याला सुरूवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा कोणताच ठावठिकाणा लागला नाही. या घटनेची नोंद देवरूख तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे.