रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील मौजे साखरीआगर खारवीवाडी वेळणेश्वर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात आले. वन विभागाने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
येथील नंदकुमार झगडे यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. आज सकाळी विहिरीत बिबटया पडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी याची खबर वन विभागाला दिली. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी खाडे, सहाय्यक विहिरीतनसंरक्षक श्री. निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती किर, वनपाल गुहागर श्री. परशेटये, वनरक्षक रानवी श्री.मांडवकर, वनरक्षक अडूर श्री . दुंडगे, वनरक्षक आबलोली श्री.सावर्डेकर यांनी विहिरीत पडलेल्या बिबटयास पिंज-यात रेस्क्यू करून सुस्थितीत ताब्यात घेतले. सदर ठिकाणी गुहागर पोलिस कॉन्स्टेबल श्री. कदम, पोलिस पाटील साखरीआगर , ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. सदरचा नर जातीचा बिबटया अंदाजे साधारणपणे दीड वर्षे वयाचा होता.