जिल्ह्यात 24 तासात 106 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 रुग्णांचा मृत्यू 

रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 106 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 36 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 72 हजार 664 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 26 टक्के आहे. नव्याने 106 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 286 इतकी झाली आहे. 

 शुक्रवारी मृत्यूसंख्या पाचवर पोहचली होती. गेल्या चोवीस तासांत 2 मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 352 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 515 तर संस्थात्मक विलीकरणात 275 रुग्ण उपचार घेत आहेत.