रत्नागिरी:- शिवसेना पक्षामार्फत 18 ते 29 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील हातखंबा येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. पहिल्याच दिवशी 1 हजार 195 तरुणांचे लसीकरण या शिबिरात करण्यात आले.
शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमात ना. सामंत म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या परिवारातील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घेणे हे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्याचा विचार सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
शुक्रवारी झालेल्या लसीकरण कॅम्प मध्ये हातखंबा पंचायत समिती गणं 380 आणि पाली पंचायत समिती गण 815 असे एकूण 1195 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
या लसीकरण कार्यक्रमाला साईनाथ दुर्गे , नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, जि.प.सदस्य बाबूशेठ म्हाप, परशुराम कदम, संजना माने, कांचनताई नागवेकर, तुषार साळवी व संबंधित उपस्थित होते.