लसीच्या ऑफलाईन डोसचे अधिकार रनपकडे ठेवा

 रनप सभेत ठराव मंजूर

रत्नागिरी:-शहरात कोरोना लसीचे ऑफलाईन डोस देण्याचे अधिकार रनपकडे ठेवा. केंद्रावर लस देताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या. ऑफलाईन लस देताना कोणत्याही एका संस्थेला अधिकार देऊ नयेत अशी मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली. यानुसार ऑफलाईन लस देताना नगरसेवकांना विश्वासात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

रनपची मासीक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ऑफलाईन डोसचा विषय भाजप नगरसेवक राजेश तोडणकर यांनी मांडला. पटवर्धन हायस्कुल येथे ऑफलाईन डोस देण्यावरून मोठा गदारोळ झाला. नगरसेवकांनी दिलेल्या यादीतील नागरिकांना लस मिळालीच नाही तर एका विशिष्ट संस्थेने दिलेल्या यादीतील लाभार्त्याना लस देण्यात आली. यामुळे स्थानिक नगरसेवकांना नाराजीचा सामना करावा लागतो आणि शिवाय स्थानिक नागरिक देखील लसी पासून वंचित राहतात. स्थानिक नगरसेवकांना किमान 15 ते 20 ऑफलाईन डोस देण्याचे अधिकार मिळावेत अशी मागणी नगरसेवक राजू तोडणकर यांनी केल्यानंतर हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. 

पावसाळ्यातील नाले सफाईसाठी रनपने कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ठेका काढुनही शहरात सफाई झाली नाही. त्यामुळेच गटारं तुंबुन शहरात पाणी भरले. पाणी एवढे भरले की नागरिकांच्या घरात शिरले. त्यांचे प्रचंड नुकसान झाले. ज्या नागरिकांच्या घरात पावासाचे पाणी शिरले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप कडून करण्यात आली. तसे निवेदन नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना दिले.

उत्तर देताना बंड्या साळवी म्हणाले, पाऊस प्रचंड असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. नालेसफाई पुर्ण झाली आहे. मात्र नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची कोणतीही तरतुद आपल्याकडे नाही. तरी आम्ही याचा विचार करू. मात्र या निवेदनाबरोबर नुकसान झाल्याचे काही फोटोही जोडा, असे साळवी यांनी स्पष्ट केले. एवढ्या राजू तोडणकर, तिवरेकर उभे राहिले. आमच्याकडे नाले सफाईलचा एकदाच सफाई कर्मचारी आले. त्यानंतर आलेच नाही. नाले सफाईच झालेली नसल्यानेच शहरात पाणी भरले, असे त्यांनी स्पष्ट केले.