चोरीच्या तयारीत असणारे चोरटे गुहागर पोलिसांकडून जेरबंद

गुहागर:- ते पुन्हा चोरी करण्यासाठी आले आणि त्याच वेळी गुहागरच्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. गुहागर पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुहागर तालुक्यातील रानवी येथे काही दिवसांपूर्वी इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी जे पोल वापरण्यात येतात ते 8 लाख 54 हजार रुपये किंमतीचे 155 पोल चोरीला गेल्याची घटना घडली होती.

या घटनेचा तपास करताना हे चोर पुन्हा कोकणात चोरी करण्यासाठी आले आहेत हे गुहागर पोलिसांना तपास करताना लक्षात आले. त्याचवेळी गुहागर पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना चोरी करण्यासाठी आले असता संगमेश्वर तालुक्यात पकडले पोलिसांच्या या धडक कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काही दिवसांपूर्वी रानवी येथील हिंदुस्थान रीसॉर्टमधून इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी वापरण्यात येणारे पोल चोरीला गेले होते. या चोरीचा तपास करताना गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम व त्यांच्या टीमला हे चोर पुन्हा चोरी करण्यासाठी येत असल्याची मिळाली. त्याचवेळी गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याच रात्री संगमेश्वर येथे जाऊन त्या चार चोरांना पकडण्यात यश आले. यावेळी गुहागर पोलिस स्टेशनमधील राजू कांबळे, वैभव चौगले, विद्याधर नारकर, स्वप्निल शिवलकर, शैलेश वणगे, प्रथमेश कदम, सचिन पाटील, वैभव ओहोळ, प्रतीक रहाटे, विजय चव्हाण हे कर्मचारी उपस्थित होते.