जिल्ह्यात 24 तासात 494 कोरोना बाधित; 16 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 494 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 494 रुणांपैकी 265 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 228 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 494 नव्या रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 35 हजार 536 झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 16 मृत्यूूंची नोंद झाली आहे.

मागील 24 तासात 16 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यू आणि वाढलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य विभाग चिंतेत आहे. नव्याने झालेल्या 16 मृत्यू पैकी रत्नागिरी तालुक्यात 5 मृत्यू आहेत. याशिवाय लांजा 2, राजापूर 1, संगमेश्वर 2, दापोली 2, चिपळूण 2 आणि गुहागर तालुक्यात दोन मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 190 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 347 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 238, खेड 122, गुहागर 66, दापोली 105, संगमेश्वर 151, लांजा 65, राजापूर 84 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.34 % इतका आहे.

जिल्ह्यात रविवारी 402, सोमवारी 393, मंगळवारी 315, बुधवारी 635, गुरुवारी 437 तर शुक्रवारी 416 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 494 नवे रुग्ण सापडले आहेत तर गेल्या 24 तासात 699 आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह तर 1212 अँटीजेन अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी  रेट 17.67% इतका आहे.