महावितरण कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून पुन्हा उभारला डोलारा 

रत्नागिरी:- तौक्‍ते वादळामुळे महावितरणला मोठा फटका बसला असून सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात 760 गावात वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले होते. अद्यापही 479 गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील 55 पैकी 28 उपकेंद्र अद्याप बंद असून ती सुरु करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

जिल्ह्यातील साडेसात हजार ट्रान्सफार्मरपैकी साडेपाच हजार ट्रान्सफार्मर अद्याप सुरु झालेले नाहीत. एकूण 5 लाख 45 हजार 120 ग्राहकांपैकी 3 लाख 57 हजार 409 ग्राहकांचा वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही.

जिल्ह्यात एचटी 164, एलटी 391 खांब पडले आहेत. सुमारे 49 किलोमीटरची हायटेंशन लाईन नादुरुस्त आहे तर 117 किमीची एलटी लाईन नादुरुस्त आहेत. 15 ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाला आहे. जिल्ह्यात महावितरणचे 71 अधिकारी व कर्मचारी, 910 कंत्राटी कर्मचार्‍यांच्या 33 टीम कार्यरत असल्याचे महावितरणने कळवले आहे