महिलेला शिवीगाळ, मारहाणप्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- संवाद सोशल फाउंडेशनमद्धे एका महिलेने दिलेला तक्रार अर्ज मागे न घेतल्याप्रकरणी तसेच त्या महिलेची तक्रार मिटवण्यासाठी मदत न केल्याप्रकरणी फाउंडेशनच्या सेक्रेटरीपदी असलेल्या महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी 8 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वा. सुमारास राजीवडा येथे घडली.

ताहीर मुल्ला, नाझिम मजगावकर, आफान मजगावकर, खालील मजगावकर, तसववुर, मिनाज मजगावकर, फजीला आणि अस्फीया मुल्ला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात फैरोजा मुनव्वर म्हसकर (38,रा.कोकणनगर, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार,शुक्रवारी ईद सणानिमित्त त्या आपल्या सासरी राजीवड्यात गेल्या होत्या.तेव्हा संशयित त्यांच्या घराशेजारी त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी त्यांना शिवीगाळ व केस हातात धरून मारहाण केली.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले करत आहेत.