रत्नागिरी:- महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्कृष्ट काम करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना महासंचालक संजय पांडे यांनी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक जाहीर केले आहे. राज्यातील 799 कर्मचार्यांना हा सन्मान प्राप्त झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात 24 कर्मचार्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या कालावधीतही उत्कृष्ट तपासासह चांगली सेवा बजावणार्या कर्मचार्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.
गेले वर्षभर कोरोना परिस्थितीमध्येही दिवस रात्र पोलीस दल राज्यभर कार्यरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. कोरोना काळात सेवा बजावून विविध गुन्ह्यांचे तपास तेवढ्याच तत्परतेने केले जात आहेत. गेली अनेक वर्ष उत्कृष्ट सेवा बजावणार्या कर्मचार्यांच्या पाठीवर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कौतुकांची थाप मारत महासंचालक पदक जाहीर केले आहे. राज्यातील 799 पोलीस कर्मचार्यांच्या पाठीवर महासंचालकांनी कौतुकाची थाप मारली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 24 कर्मचार्यांचा समावेश आहे.
रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष महादेव माने, प्रकाश बळीराम शिंदे, संजय तुकाराम उकार्डे, नाना कृष्णा शिवगण, मिलींद भिकाजी चव्हाण, पोलीस हवालदार सचिन धनाजी साळवी, प्रकाश सीताराम मोरे, प्रशांत पांडुरंग मसुरकर, जितेंद्र शंकर कदम, महेश अरविंद कुबडे, प्रफुल्ल गजानन तारये, सचिन सुरेश भुजबळराव, विनोद बाबुराव भितळे, अजय रामचंद्र शिंदे, नितीन गोपाळ कुड, संजय हनुमंत मुठगर, मोहन रामचंद्र कांबळे, संदीप मोहन महाडीक, नितीन प्रभाकर डोमणे, विजय देवजी मावळकर, प्रशांत प्रभाकर बोरकर, पोलीस नाईक संदीप श्रीपत मालप, श्रीमती पुनम भरत वाडकर यांना पंधरा वर्षापेक्षा अधिक वर्ष उत्कृष्ट काम केल्याबद्दल, तर रोहन शेखर गमरे यांना राज्यपातळीवरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे.