जिल्ह्यात चोवीस तासांत 69 कोरोना बाधित रुग्ण

तीन रुग्णांचा मृत्यू; 47 जण कोरोनामुक्त

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 69 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता 10,848 झाली आहे. तीन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ऐन शिमगोत्सवात रुग्ण वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. 

सोमवारी जिल्ह्यात 69 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक असून सोमवारी जिल्ह्यात 69 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,848 वर जाऊन पोहचली आहे. आज आलेल्या अहवालात 54 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 15 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. मागील चोवीस तासात 1231 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 98 हजार 969 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात तब्बल 47 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 10 हजार 015 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तीन रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 375 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 92.32 टक्के आहे.

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे संक्रमण झाले आहे. नव्याने सापडलेल्या 69 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 29, खेड 1, दापोली 4, गुहागर 7, चिपळूण 17, मंडणगड 3 आणि संगमेश्वर तालुक्यात 8 रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 9.88% आहे.