देवरुख : साखरप्यानजीक मेढे या ठिकाणी रविवारी पहाटे झालेल्या दोन अपघातात ट्रक चालक जखमी झाले. अवघ्या 100 मीटर अंतरात हे दोन अपघात झाले.
या विषयी अधिक माहिती अशी की, काल पहाटेच्या सुमारास मेढे येथील सुर्वेवाडी नजीक ट्रकचे दोन अपघात झाले. कोल्हापूरहून रत्नागिरी येथे जाणारा ट्रक (क्र केए 29 बी 5457) नियंत्रण सुटल्यामुळे झाडावर जाऊन आदळला. या अपघातात चालक केबिनचा चुराडा झाला असून चालक किरकोळ जखमी झाला.
तर दुसरा अपघातही मेढेनजीक सुर्वेवाडीजवळच झाला. कोल्हापूरहून रत्नागिरीकेडे जाणारा साखरेने भरलेला ट्रक (क्र. के ए 23 ए 6833) सुर्वेवाडी एसटी स्टॉपजवळ असलेल्या पुलावर येताच चालकाचा ताबा सुटल्याने कठडा तोडून पुलावरून खाली पडला.
या अपघातात ट्रकचे नुकसान झालेच पण ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने सगळे डिझेल साखरेत मिसळले. याही अपघातात चालक जखमी झाला. दोन्ही ट्रकच्या चालकांना उपचारासाठी रत्नागिरी इथे हलवण्यात आले आहे.