रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक; चारजण जखमी

खेड:- मुंबई गोवा महामार्गालगतच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी ७.५५ वाजता हा अपघात घडला.

हैप्पी सिंग ढाब्यातील कर्मचारी आणि महामार्गावरील प्रवाशांनी जखमींना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी गावाच्या हद्दीत दिनांक २५ रोजी सकाळी ७:५५ वाजण्याच्या सुमारास ट्रेलर (क्रमांक जिजे .१२. डीएक्स. ३१०१) हा महामार्गाच्या डाव्या बाजूला हॅपी पंजाबी ढाबा येथे उभा होता, त्यावेळी मुंबई येथून खेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी स्वीफ्ट (मोटार क्रमांक एम एच ०८ ए .७६३८) ने या ट्रेलर ला पाठीमागून जोरात ठोकर दिली. या अपघातात स्वीफ्ट चालक अहमद महम्मद परकार (वय ५७) राहणार शिव बुद्रुक ता. खेड यांच्यासह मोटारीतून प्रवास करणाऱ्या जुमाना शब्बीर पालेकर (वय १५), अमीना शब्बीर पालेकर (वय ११), सुरैय्या शब्बीर पालेकर (वय ५०) सर्व राहणार शिव बुद्रुक ता. खेड हे जखमी झाले आहेत अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे, या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.