भाजप हा सत्तापिपासू पक्ष: आमदार भास्कर जाधव

रत्नागिरी:- भाजप हा सत्तापिपासू पक्ष आहे. तत्व, विधी, लोकशाहीची मुल्य सर्व पायदळी तुडवत आहे. कपोलकल्पित काहीतरी जनतपुुढे वातावरण उभा करायचे त्यातून उद्रेक माजवून दंगली घडवायच्या आणि सत्ता मिळवायची. हेच आजपर्यंत भाजप करीत आल्याने भाजपचे नाव कलंकित आणि चेहरा काळवंडलेला आहे. काँग्रेसची सत्ता जायला 60 वर्षे लागली. मात्र भाजपची सत्ता 6 वर्षांत हटविण्याच्या मागे जनता आहे, असा सणसणीत आरोप शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.  

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनिमित्त ते रत्नागिरीत आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटीच्या वसुलीच्या आरोपावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, भाजपला 50 वर्षानंतर सत्ता मिळली आहे. प्रत्येक सत्ता आपल्यालाच मिळावी, यासाठी तत्व, विधी, विशेष, लोकशाही मुल्ले, पायदळी तुडवली आहे. ज्या ठिकाणी राज्य आले आहे, त्याठिकाणी हा उद्रेक माजविला आहे. गुजरात खासदार महाराष्ट्रात आणि हिमाचल खासदार दिल्लीत आत्महत्या करतात. कर्नाटकचे मंत्री महिलीचे लैगिंक शोषण करतात. कर्नाटाचत राजकीय दुही माजली आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री बदलावे लागले. त्यामुळे हळुहळु लोक भाजपची साथ सोडत आहेत.

शेतकर्‍यांचे दिल्लीत 82 दिवस आंदोलन सुरू आहे. भाजपला तोंड दाखवाल जागा नाही. जीडीपी 9 टक्केवर होता, तो रिव्हस आला आहे. महागाई वाढली आहे.  पेट्रोल-डिझेल गगनाळा भिडले आहेत. अनेक मोठे उपक्रम विकायला काढले आहे. त्यामुळे भाजपचा चेहरा काळवंडले आहे. म्हणून राज्यात असे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. चंद्राबाबू नायडू, आकाली दलाने पाठिंबा काढून घेतला. चढ आल्यानंतर उतार येतोच, असा आरोप भास्कर जाधव यांनी केले.