जि. प. अध्यक्षपदी विक्रांत जाधव तर उपाध्यक्ष पदासाठी उदय बने यांच्या नावावर शिक्कामोर्तब


रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाच्या निवडीचा पेच अखेर सुटला आहे. अध्यक्ष पदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. तर अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार उदय बने यांना उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतला आहे. सोमवारी सकाळी 11.30 वाजता ही नावे अंतिम करण्यात आली.