नाचणेत घराला आग लागून अडीच लाखांचे नुकसान

रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथे घराला अचानकपणे आग लागून सुमारे 2 लाख 65 हजार 430 रुपयांचे नुकसान झाले.ही घटना रविवारी दुपारी 12.30 वा.सुमारास घडली असून शहर पोलिस ठाण्यात याची नोंद रात्री उशिरा करण्यात आली आहे.

शर्मिला महेश यादव (42,रा.नाचणे शांतीनगर रसाळवाडी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानुसार रविवारी दुपारी त्या काहि कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना त्यांच्या घराला अचानकपणे आग लागली.लागल्याचे समजताच आजुबाजुच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.साधारणपणे तीन तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले.आग आटोक्यात आल्यावर शर्मिला यादव यांनी घरात जाउन पाहिले असता घरातील किंमती साहित्य जळून सुमारे 2 लाख 65 हजार 430 रुपयांचे नुकसान झाले होते.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल गायकवाड करत आहेत.