शिमगोत्सव साध्या पद्धतीने; पालखी खेळण्याची परवानगी नाही

ना. सामंत; वेळेची देखील मर्यादा 

रत्नागिरीः यावर्षीचा शिमगोत्सव कोरोनाचे नियमाचे पालन करुन करण्यात येणार आहे. तर कोकणातील सर्वात मोठा असलेला भैरी उत्सवहि साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजल्यानंतर भाविकांना देवस्थान बंद ठेवून ऑनलाईन, युट्यूबच्या माध्यमातून दर्शन देण्याची सुविधा देवस्थानमार्फत करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने यावर्षी शिमगोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात देवस्थानच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये ५० देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक ग्रामदेवतेच्या मंदिरात आरोग्य विभाग, महसूल आणि पोलीस देवस्थानच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहे.

तर भैरी देवस्थानमार्फत दि.१४ रोजी बैठक होणार आहे. यावर्षी पालखी खेळविली जाणार नाही. भक्तांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टींन्सीगचे पालन करावे लागणार आहे. तर होळीहि कमी कालावधी उभी करण्यात येणार असल्याचे भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी सांगितले.