45 वर्षांवरील 3 हजार 957 जणांना कोरोना लसीकरण 

रत्नागिरी:- 1 एप्रिल 2021 या दिवसापासून देशभरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यास प्रारंभ झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यादिवशी 45 वयोगटावरील 3 हजार 957 नागरिकांना यादिवशी लसीकरणाचा लाभ देण्यात आला.  
 

लसीकरणात सुरूवातीला वैद्यकीय कर्मचारी, कोरोना योद्धे, 60 वर्षांवर वय असणारे नागरिक आणि इतर गंभीर आजार असलेले 45 वर्षांवर वय असणारे नागरिक यांना कोविडची लस देण्यात येत होती. 31 मार्चपर्यंत याच लोकांना लस मिळत होती. 1 एपिलपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 75 हजार 600 लोकांना कोरोना लसिकरणाचा लाभ देण्यात आलेला आहे.   

1 एप्रिल गुरुवारपासून सुरू झालेल्या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यात 1 एपिल या दिवशी 45 वर्षांवरील 3 हजार 957 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. कोविड-19 विषाणूची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्या एकूण व्यक्तींपैकी 88 टक्के लोक 45 वर्षांवरील होते. त्यामुळे या गटातील व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी ही लसीकरण मोहिम आरोग्य विभागामार्फत गतीमान करण्यात आलेली आहे.