रत्नागिरी:- आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील उद्यमनगर रत्नागिरी येथील 83 वर्षीय महिला रुग्ण, लाला कॉम्प्लेक्स, रत्नागिरी येथील 59 वर्षीय रुग्ण आणि माळनाका रत्नागिरी येथील 65 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. तसेच गुहागर तालुक्यातील कोडंकारळ येथील 38 वर्षी रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 91 झाली आहे.
काल सायंकाळपासून 93 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2580 झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 5, कोव्हीड केअर सेंटर घरडा 7, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 4, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर, गुहागर 10, कोव्हीड केअर सेटर, केकेव्ही, दापोली 12, कोव्हीड केअर सेंटर,समाजकल्याण 85, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे, चिपळूण 17,, माटे हॉल, चिपळूण 1, तसेच 12 रुग्ण होम ऑयसोलेश तसेच इतर जिल्हयात उपचार घेत असताना बरे झाले व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1769 झाली आहे.