रत्नागिरी:- गुरुवारी रात्री आलेल्या कोरोना अहवालाने रत्नागिरी शहर आणि परिसरात धडकी भरवली आहे. नव्या अहवालात शहर पोलीस स्थानकातील 2, ग्रामीण पोलीस स्थानकातील 1 तर एका माजी नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
गुरुवारी रात्री तालुक्यातीळ अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात तीन पोलीस कर्मचारी असून यात शहर पोलीस स्थानकातील आणखी दोन तर ग्रामीण पोलीस स्थानकातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय एका माजी जेष्ठ नगरसेवकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
याशिवाय भाट्ये नवानगर, आठवडा बाजार, गोळप, पूर्णगड, मारुती मंदिर, खेडशी येथे 2, कर्ला, रवींद्र नगर, कापडगाव, सैतवडे आणि जेके फाईल येथे नवे रुग्ण सापडले आहेत.