जिल्ह्यात एकूण 2747 कोरोना ग्रस्त; आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू
रत्नागिरी:- गेल्या 24 तासात जिल्ह्यात ॲन्टीजेन चाचणीत 41 तर आरटीपीसीआर चाचणीत 25 असे एकूण 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2747 इतकी झाली. तर आज तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला. यातील 4 कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आहेत.
नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 25 तर ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरी 18, राजापूर 1, लांजा 5, संगमेश्वर 8, घरडा रुग्णालय 9 येथील रुग्णांचा समावेश आहे.
आज प्राप्त माहितीनुसार 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. चिपळूण तालुक्यातील खिंडी येथील 65 वर्षीय रुग्णाचा, डोकलवाडी येथील 65 वर्षीय महिलेचा, खेड तालुक्यातील भोस्ते येथील 65 महिला रुग्ण, खेड येथील 55 वर्षीय रुग्ण, लोटे येथील 70 वर्षीय रुग्णाचा, दाभोळ, दापोली येथील 73 वर्षीय कोरोना रुग्णाचा आणि गवळीवाडा, रत्नागिरी येथील 72 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 101 झाली आहे.