24 तासात जिल्ह्यात तब्बल 47 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:-जिल्ह्यात परत एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून मागील 24 तासात जिल्ह्यात 47 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 18 रुग्णांचा समावेश आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 371 बळी घेतले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 47  रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 365 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 711 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 91 हजार 536 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 7 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेलेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 371 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.52 टक्के आहे.

24 तासात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 18, चिपळूण 13, दापोली 3, खेड 5, संगमेश्वर 5, गुहागर 1, मंडणगड 1 आणि राजापूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.