भर दुपारी मांडवी येथील इमारतीला शॉर्टसर्किटने आग

एक तासाने आग आटोक्यात; भंगार जळून खाक

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील क्षितीज अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसच्या लगत शॉर्टसर्किटने आग लागली. मात्र भर दुपारी इमारतीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पालिकेच्या व एमआयडीसीच्या अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली.

ही घटना बुधवारी (ता. २०) दुपारी एक ते दीडच्या सुमारास ८० फुटी हायवे येथील क्षितिज अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर लागली. तेथे असित कादर खान यांच्या रुम आहे. टेरेस नजीक भिंतीवर विजेच्या वायरला शॉर्टसर्किंटने आग लागली. त्यामुळे टेरेसजवळ ठेवलेले भंगार सामान, टायर, सायकली व इतर अन्य सामान जळून खाक झाले. टायरने पेट घेतल्यामुळे पुर्ण इमारतीला धुरांडे वाहू लागले. भर दुपारी लागलेल्या आगीमुळे तेथील नागरिकांची तारांबळ उडाली त्यांनी पालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण केले. तात्काळ पालिकेचे अग्नीशमन दलाचे कर्मचारी नरेश मोहिते, रोहन घोसाळे, संकेत पिलणकर, सुरज पवार, शुभम शिवलकर यांनी येऊन ही आग आटोक्यात आणली. धुराचे लोट जास्त वाहू लागल्यानंतर घटनास्थळी एमआयडीसी येथील अग्नीशमन दलाला बोलविण्यात आले होते. मात्र या आगीत भंगार जळून खाक झाले. तसेच इमारतीच्या भिंतींना आगीने व धुरामुळे काळ्या झाल्या. मात्र भर दुपारी लागलेल्या आगीमुळे अपार्टमेंट मधील नागरिकांची तारांबळ उडाली. एक तासाने ही आग आटोक्यात आली. त्यावेळी नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.