पावस:- तालुक्यातील नाखरे -धनगरवाडी येथील तरुण रात्री आठ वाजता झोपला तो उठलाच नाही. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय गोविंद गोरे (३७, रा. नाखरे धनगरवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. १८) रात्री घरात झोपला होता मंगळवारी त्याची आई सकाळी सातच्या सुमारास उठविण्यास गेली असता त्याची हालचाल होत नव्हती. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.