आरे-वारे समुद्रात तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे समुद्रात तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मनोज बाळकृष्ण पाटील (वय ४०, मूळ मिरजोळे पाटीलवाडी, सध्या आरे पोस्टजवळ बसणी, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी आरे-वारे समुद्रात काही मच्छीमार मासेमारी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना एक मृतदेह समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यांनी याबाबत पोलिस पाटील आणि ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, अन्य ग्रामस्थ घटनास्थळी गेले असता मनोज याच्या मेहुण्याने मृतदेहाची ओळख पटवली. गुरुवारी दुपार ते रात्रीच्या कालावधीत मनोजने अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.