भाजपशी फारकत घेणाऱ्यांशी आपली बांधिलकी संपली: रवींद्र चव्हाण

रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीला यावेळी आपल्याला वेगळ्या वातावरणात सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपशी फारकत घेणाऱ्यांशी आपली बांधिलकी संपली, त्यांच्याशी आता आपला काही संबंध नाही, असा टोला बाळ माने यांना देत महाराष्ट्रात देवेंद्र फडणविस आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचे प्रामाणिक काम करून मोठ्या फरकाना त्यांना निवडुण आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहन भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केले.

शहरातील जयश मंगल पार्कमधये महायुतीतील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उमेदवार उदय सामंत, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, माजी आमदार प्रमोद जठार, ॲड. बाबा परुळेकर, अशोक मयेकर, ॲड. विलास पाटणे, विवेक सुर्वे, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपला जिल्ह्यात एकतरी जागा मिळावी, यासाठी आमचे टोकाचे प्रयत्न होते. परंतु त्या यश आले नाही. महायुतीत हे आपले एक परिवार आहे आणि एक परिवार म्हणून आपल्याला भाजपचे प्रामाणिक काम करायचे आहे. या परिस्थिती चुका होऊ नये, यासाठी यापुर्वी आपण अनेक शिबिर घेतली, बैठका घेतल्या. आपली एक विचारधारा आहे म्हणून आज आपण सर्व समोर आहात. पण एवढ्यावर भागणार नाही. फडणवीस आणि मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पसरविला जाणारा फेक नॅरेटिव्ह आपल्याला हद्दपार करायचा आहे. आपण हरियाणात उतरल्यानंतर जसे यश मिळाले तसे आपल्याला महाराष्ट्रात उतरायचे आहे. त्यासाठी टोकाचा प्रयत्न करून सुक्ष्म नियोजन करा. आदी काय घडले, असे सांगत अनकेजण मिटाचा खडा टाकतील. परंतु आपल्याला एकसंघ आणि एक विचाराने या निवडणुकीला सामोरे जात ही लढाई काही झाले तरी लढायची आहे.

अनेक वर्षांपासून रत्नागिरी हा शिवसेवा- भाजपचा बालेकिल्ला आहे. तो यावेळी देखील कायम राखायचा आहे. केंद्रा आणि राज्य शासनान आपल्या सर्वसामान्यांचे आहे. आपण जनतेसाठी किती योजना आणल्या हे लोकांपर्यंत पोहचवा. घरा-घरात जाऊन हे पटवुन द्या. मतदान केंद्रापर्यत मतदारांना आणून मतदान करून घ्या. कारण आपले एक विचाराचे सरकार येणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही भुलथापांना बळी पडु नका, आपल्या पक्षाशी फारकत घेणाऱ्याशी आता संबंध नाहीत, असे चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे ब्रेनवॉश केला.