पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणात आणण्याचे खा. श्रीकांत शिंदेंचे सुतोवाच
रत्नागिरी:- गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही कोणते निर्णय घेतले हे सांगू शकतो पण ते सांगू शकत नाहीत. कारण त्यांनी अडीच वर्षे स्वतःला बंद करून घेतलं होतं. अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. कोकणात येथील लोकांना जो प्रकल्प नको तो प्रकल्प कोकणात येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. असं सांगत श्रीकांत शिंदे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पण पर्यावरण पूरक प्रकल्प कोकणात आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि त्याची सुरुवात झाली आहे आणि लवकरच हजारो तरुणांना रोजगार मिळेल. असा मोठा प्रकल्प येथे येईल असेही जाहीर सुतोवाच शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. या राजापूर मध्ये पर्यावरण पूरक असा शंभर टक्के मोठ्या प्रकल्प येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर ना. रविंद्र चव्हाण, ना. उदय सामंत, किरण सामंत उपस्थित होते.
“रोज सकाळी कोणीतरी उठलं की शिव्या दयायच्या कोणतरी रोज उठत आणि सांगतो उद्योगधंदे इकडे गेले तिकडे गेले असे सांगत हा फेक नेरेटीव्ह चालवण्याचं काम विरोधकांकडून केले जात आहे”, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला.
त्यांच्या काळात अडीच वर्षात काही सामंजस्य करार उद्योगांबाबत झाले झाले पण एकही प्रकल्प जागेवरती झाला नाही आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला दाखवा जागेवर घेऊन जा आणि प्रकल्प दाखवा पण काहीच काम झालं नव्हतं असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला. त्यांच्या काळात एकही प्रकल्प आला नाही एकाही प्रकल्पाची सुरुवात झाली नाही आम्हाला घेऊन जा आणि दाखवा तुमच्या काळात झालेल्या एम ओ यु केलेल्या पैकी प्रकल्प आले असे थेट आव्हान श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांना दिलं एखादं काम दिल्यानंतर ते काम पूर्ण कस होईल यासाठी पाठपुरावा हा नेहमी किरण भैयांचा असतो 23 तारखेला तुम्ही आमदार म्हणून निवडून याल असे शब्द त्यांनी हो कायलांजा राजापूर मतदारसंघाचे किरण सामंत त्यांचे कौतुक केलं.