आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चिपळुणात 43 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस

चिपळूण:- विधानसभा निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासह आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, त्या दृष्टीने चिपळूण पोलिसांनी आतापर्यंत 43 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस दिल्या आहेत. उर्वरित काहींना नोटीसा देण्याची प्रक्रिया सुरु असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पेलिसांकडून सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचार यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. निवडणूक कालावधी शांततेत जावा, यासाठी पोलीस यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. याबरोबरच शहरासह मुख्य ठिकाणी तपासणी नाके कार्यरत असून प्रत्येक वाहनाची त्या ठिकाणी तपासणी केली जात आहे. एकीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कार्यरत असताना दुसरीकडे या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासह आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये, निवडणूक शांततापूर्वक पार पडावी, या दृष्टीने चिपळूण पोलिसांनी आतापर्यंत 43 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस दिल्या आहेत. उर्वरित काहींना नोटीसा देण्याची प्रक्रिया सुरु असून नोटीसा दिलेल्यांपैकी कोणाकडूनही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासह आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्याच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पेलिसांकडून सांगण्यात आले.